Monday, June 14, 2010

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे


Wonder what This 'Sai Baba' is so sad about...
अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे...

किल्ले माहुली, आसनगाव

मी आणि माझे तीन मित्र, आसनगाव येथील माहुली गडावर ट्रेकिंग साठी गेलो होतो. सकाळी ५:५६ ची कसारा लोकल पकडली. आसनगाव रेल्वे स्टेशन पासून गड साधारण ४ कि.मी. अंतरावर आहे. आम्ही जरा खर्चिक पर्याय निवडून गडाकडे जाण्यासाठी रिक्शा केली. तब्बल १२५ रू. मोजून. तसा गड अगदी स्टेशनवरूनही दिसतो. पण हायवे पासून आत ३-४ कि.मी गेल्यावर गडाचं जवळून दर्शन झालं.


पायथ्याशी असलेल्या शंकराच्या देवळाजवळ गावातला एक माणूस भेटला. त्या माणसाकडून रस्ता समजून घेतला आणि चढायला सुरुवात केली. पण पहिल्या ५ मिनिटातच चुकलो. आम्हाला कळलं, की आम्ही रस्ता चुकलो पण एक बरं झालं की त्या व्यक्तीचा फ़ोन आम्ही घेतला होता. त्याच्याशी बोलून मग बरोबर रस्त्याला लागलो. पुढचे ३ - ३.३० तास जंगलातल्या त्या दगडी वाटेवरून, उंच पाय-यांवरून वाटचाल करत होतो.




चढण्याच्या नादात फ़ोटो काढणं तसं झालंच नाही. वाटेवर ३-४ ट्रेकर ग्रूप भेटले. साधारण ७०-८० % अंतर गेल्यावर आम्ही परत फ़िरायचं ठरवलं. या वेळी आम्ही शिखर गाठू शकलो नसलो तरी पुढच्या वेळी ते गाठूच, या विश्वासाने गड उतरायला सुरुवात केली.


एकंदरीत ट्रेक खूप छान झाला. रोजच्या दगदगीपेक्शा ही दगदग खूप आनंद देणारी होती. मुंबईपासून फ़क्त ७८ कि.मी आणि ठाण्यापासून ४८ किमी वर असणारा हा गड ट्रेकिंग आवडणा-यांनी नक्कीच बघावा असा आहे. तसं सर्वांसाठीच हे एक सुंदर आणि काहीसं साहसी असं सहलीचं ठिकाण होऊ शकतं.




(संक्शिप्त माहिती : किल्ले माहुली. आसनगाव. ठाणे जिल्हा. उंची: २८१५ फ़ूट. काठिण्यस्तर - मध्यम)